एक काळी संध्याकाळ
संध्याकाळचे जेमतेम साडे पाच वाजले असतील, मी आई-बाबांना घेऊन लक्ष्मीपुरी मध्ये पोचलो. त्यांची रेगुलर अपॉइंटमेंट होती जोशी डॉक्टरांकडे. मी गाडी दवाखान्याच्या इमारती समोर उभी केली. सूर्य मावळतीला आला होता, सावल्या लांबणीला लागल्या होत्या आणि उंच इमारती मागून तो दिसेनासा झाला होता. आई-बाबा अपॉइंटमेंट चुकेल म्हणून तडक दवाखान्यात निघून गेले. लक्ष्मीपुरी तशी कोल्हापूरची प्रसिद्ध बाजारपेठ, सदैव गजबजलेली. संध्याकाळची वेळ असल्याने बरेच कामगार, हमाल हे आपलं काम आटोपून आपापल्या घरी जायच्या गडबडीत दिसत होते. काही दुकानांमध्ये गिऱ्हाइकांची गर्दी अजूनही होतीच आणि रस्त्यावर लोकांची येजा सुरूच होती. जोशींच्या दवाखान्यात जायचं म्हटलं की एक दोन तास तरी वाट बघायला लागायचीच. मी मात्र गाडीतच राहण पसंत करायचो. कधी रेडिओ ऐकायचो तर कधी मित्र मैत्रिणी किवां आमच्या सौ बरोबर फोन वरून गप्पा मारत बसायचो. आई-बाबांना यायला निदान एक तास तरी लागेल हे माहीत होतं. मी आपला एफ एम ऑन करून गाणी ऐकत नेहमीप्रमाणे बसून होतो.
दवाखान्याच्या इमारतीमध्येच तळमजल्यावर एक देशी दारूचे दुकान होते. मी नेहमी तिथे थांबलो की त्या दुकानातून येणाजाणाऱ्या पिंडकरामांची गंमत बघत टाईमपास करायचो. कोण कसा झिंगत बाहेर येतो, कुणाची कॉलर आत जाताना खाली तर बाहेर पडताना अगदी ताठ झालेली असायची, पिल्या नंतर असा काही होत याची खरंच गम्मत वाटायची. लोक चालत आत जायचीत आणि तरंगतच बाहेर यायचीत. कोण तोंड वाकड करीत पिचकाऱ्या मारीत बाहेर येई तर कुणी दातखिळी बसल्यासारखे दातावर दात दाबीत निळू फुले स्टाईल मध्ये बाहेर येई. नेहमीप्रमाने याही वेळेला माझं निरीक्षण सुरूच होतं. तेवढ्यात एक बाई तिथे आली, साधारणत तिशीच्या आतली असेल. कळकटलेली जुनी पुरानी साडी तिच्या अंगावर होती, केस विस्कटलेले, चेहरा काळवंडलेला, बऱ्याच दिवसात आंघोळीचं तोंड पाहिलं नसावं. तिच्या खांद्यावर एक झोळी होती, बहुदा कचरा जमा करणारी असावी. जशी ती त्या दुकानाजवळ आली, तिच्या मागोमाग एक लहान पोर, दोन एक वर्षाच असेल, त्या झोळीला पकडून तिथं आलं. दिसायला अतिशय अशक्त, नावाला अंगावर चिमूटभर मास असेल त्याच्या, हाता पायाच्या फक्त काड्या, डोळे निस्तेज, मानेच्या दोऱ्या दिसत होत्या, त्या डोक्याचा भार सुद्धा पेलवत नव्हता त्या मानेला, केस भूरकटलेले, काही ठिकाणी केसांच्या जटा देखील झालेल्या, डोक्याच्या मागच्या बाजूला कसल्या तरी त्वचारोगाने ग्रासलेली त्वचा दिसत होती. त्याच्या नाकातून शेम्बडाची धार लागली होती आणि हातात पावाचा एक तुकडा होता. अंगावर नावापुरता शर्ट होता तोही मळकट, खाली तर काही नव्हतंच.
ती बाई त्या दारूच्या दुकानाजवळ थांबली, खांद्यावरची झोळी तिने बाजूला ठेवली आणि खाली बसली. ते बाळ सुद्धा तिच्याबरोबर थांबलं आणि तिथेच असलेल्या दगडगोट्यानी खेळायला लागलं. बर्याचदा त्याच्या हातातला तो पावाचा तुकडा खाली पडायचा. पुन्हा तो पडलेला पावाचा तुकडा उचलून ते तोंडात घालायचं. त्या बाईने तिथेच बसून दुकानात कोणालातरी हाक मारली, इतक्यात एक इसम त्या दुकानातून बाहेर आला, कदाचित तिथे काम करणारा कामगार असावा. तिने कुठून तरी वीस रुपयाची नोट काढून त्याच्या हातावर टेकवली. ती घेऊन तो ताडकन आत निघून गेला आणि थोड्याच वेळात आर्धी कॉर्टर घेऊन बाहेर आला. त्याने ती बाटली तिच्यासमोर ठेवली आणि तो निघून गेला. तिने तिच्या झोळीतून एक प्लास्टिकचा ग्लास काढला, बहुदा उष्टाच असावा की कुठल्या उकिरड्यावरून उचलला होता माहित नाही. तिने त्या बाटलीतली दारू त्या ग्लासमध्ये थोडीशी ओतून घेतली आणि झोळीतून एक कागदाची पुडी बाहेर काढली, कदाचित चिरमुरे फुटाणे असावेत, मला स्पष्ट दिसत नव्हतं. त्या ग्लास मधला एक एक घोट घेत ती ते चणे-फुटाणे खाऊ लागली. खरंतर स्त्रियांना दारू पिताना बघणं माझ्यासाठी काही वेगळं नव्हतं, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी हि नवलाची गोस्ट नव्हतीच. कंपनीच्या पार्ट्यांमध्ये बऱ्याचदा स्त्री सहकाऱ्यांबरोबर पिण्याचा योग आला होता. त्यांना दारू एन्जॉय करताना मी पाहिलं होतं. मी विचार करत होतो ही बाई तशी बेघर दिसत होती आणि कामच करत असावी तर उकिरड्यावरले प्लास्टिक किंवा असंच काही उचलण्याचं, पण तरीसुद्धा तिच्याकडे ह्या अवस्थेतहि दारू पिण्याचे पैसे होते या गोष्टीच मला नवल वाटत होतं. ती एन्जॉयमेंट म्हणून नक्कीच पीत नव्हती.
हळूहळू त्या ग्लासातली दारू पीत ती त्या पुडीतला खाऊ खात होती. ग्लास रिकामा झाल्यावर, उरलेली बाटली तिने परत त्या ग्लासात ओतली. हे सगळं होत असताना ते निष्पप बाळ मात्र तिच्याच बाजूला बसून तिथे असलेल्या दगडगोट्यांबरोबर खेळत होतं आणि एका हाताने तो पावाचा तुकडा चघळत होतं. ती बाई ते दारुचे घोट घेत असताना प्रत्येक घोटा नंतर समोर शून्यात पाहायची. तिच्या चेहऱ्यावरती कुठलेच हावभाव नव्हते आणि एकापाठोपाठ एक घोट ती ढकलतच चालली होती. दुसरा भरलेला ग्लास संपवताना तिच्या पुडीतला खाऊ संपला होता, मग तिने त्या बाळाच्या हातातला तो पावाचा तुकडा हिसकावून घेतला आणि त्या उरलेल्या दारू बरोबर ती तो पावाचा तुकडा खाऊ लागली. ते पाहून मला खूप किळस आली आणि ती गोस्ट खटकली सुद्धा, एखादी आई आपल्या मुलाच्या तोंडचा घास कशी बर काढून घेऊ शकते, त्या दृश्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मनात विचार आला कदाचित हे मुलं तीच नसावच, तिने कुठून तरी त्याला उचलल असावं. हा विचार मनात येताच मन हेलावून गेलं. तिने तो पावाचा तुकडा काढून घेताच ते बाळ दबक्या आवाजात रडायला लागलं व तो तिच्याकडून काढून घ्यायचा केवीलवाना प्रयन्त करायला लागलं, त्याच्या अशक्त अवस्थेमुळे त्याच्या रडण्यात जरासुद्धा जोर नव्हता, पण त्या बाईला त्याचं काहीच वाटलं नाही. पुन्हा शुन्यात बघत ती एक एक घोट रिचवत तो पावाचा तुकडा खाऊ लागली. मनात विचार आला एक दहा रुपयाची नोट त्या मुलाच्या हातात द्यावी पण दुसऱ्याच क्षणी असही वाटलं की जर मी ती नोट त्याला दिली तर कदाचित ती बाई ती त्याच्याकडून घेऊन पुन्हा त्याची दारूच प्यायची. मग मी तसाच गाडीमध्ये बसून ते केविलवाणे दृश्य पहात राहिलो.
थोड्याच वेळात तिचा तो ग्लास संपला आणि उरलासुरला पावाचा तुकडाही तिने संपवला. ते बाळ आता दबक्या आवाजात रडून-रडून स्थिरावलं होतं आणि पुन्हयांदा आजूबाजूच्या दगडगोट्यानी खेळायला लागलं होतं. मग मनात विचार आला पैसे नाही निदान मी थोडा खाऊ का होईना त्या मुलाला देऊ शकतो. क्षणाचाही विलंब न करता मी गाडीतून उतरलो आणि समोरच्या दुकानांमध्ये बिस्कीटचा पुडा आणण्यासाठी निघालो. तोपर्यंत सायंकाळ गडद झाली होती. दुकानात थोडीफार गर्दी होती म्हणून मला परत यायला जरा वेळ लागला. बिस्किटचा पुडा घेऊन मी जसा मागे परतलो, गाडी जवळ येताच लक्षात आलं की ते दोघेही तिथून निघून गेले होते. मी आजूबाजूला त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, माझ्या डाव्या बाजूला पाहिलं तर, माझ्या पासून काही अंतरावर ती बाई तिची झोळी घेऊन झुलत रस्त्याच्या कडेने निघाली होती आणि ते बाळ अनवाणी पायानी त्याच झोळीला धरून तिच्यामागे फरपटत निघालं होतं. मी मात्र ते दिन दृश्य पहात तिथेच उभा होतो, पुढे जाऊन त्या मुलाच्या हातात तो बिस्कीटचा पुडा देण्याचं धाडस मात्र मला झालं नाही. मी त्या मलूल पावलांना माझ्या पासून दूर जाताना फक्त हताशपणे पहात राहिलो . डोळ्यात पाणी तरळल होत, एखादा थेंब कदाचित सांडला असता पण इतक्यात बाबांची हाक कानावर आली आणि मी जागा झालो. गाडी पुन्हा घराच्या दिशेने परतली. पुन्हा एक नजर पहिले तर ते दोघेही नजरेआड झाले होते. घरी परतताना रस्ता हळू हळू सरू लागला पण ते मुलं नजरेसमोरून सरत नव्हतं. नाना प्रकारचे विचार मनात घोळत होते. ते मूल नक्की कुणाच असावं आणि ते या अवस्थेमध्ये का? त्याचं पुढे काय होईल? ते परत मला दिसेल का ? आणि दिसलच तर मला त्याची मदत करता येईल का? अशा अनेक विचारांनी डोकं ग्रासलं होतं. त्या रात्री अंथरुणावर पडल्यावर खूप वेळ हेच विचार मनात घोळत होते, मध्य रात्री कधीतरी झोप लागली. आजही जेव्हा जेव्हा आई बाबांना त्या दवाखान्यात घेऊन जातो तेव्हा हा प्रसंग आठवल्याशिवाय राहत नाही आणि ती आठवण आजही अंगावर शहारे आणते. माझे डोळे सतत नकळत त्या मुलाचा शोध घेत राहतात पण ते परत कधी दिसलच नाही. विषमतेने भरलेल्या या जगात एक मुल असही कुठेतरी जीवन जगत असेल, ते सध्या काय करत असेल, ते जिवंत तरी असेल ना?
-नितिन लकडे

जगाचा भेसूर चेहरा दाखवणाऱ्या काही कहाण्या असतात, त्यापैकी एक। मन सुन्न होऊन जाते। नितीनजी, आपण लिहीत राहावे. आपणाकडून लवकरच आणखी वाचायला मिळेल हीच अपेक्षा. पहिल्या ब्लॉग स्टोरी बद्दल अभिनंदन. पुढील लिखाणासाठी मनापासून शुभेच्छा : आपलाच इरशाद.
ReplyDeleteThank you Bro.... your tips were helpful
DeleteKatha wachalyanantr jvl jvl 5 tari kahi suchale nahi.js jse pude wachat hote ts ts te sgle drushya samor ubhe rahat astil.. Jagat khup kmi astil je ashya niradhar lokanbddl evda vichar krt astil.. Khupch heart touching story ahe Nitin Sir.. Asech lihit ja... Pahilya story sathi congrats...ani pudhil watchalis All the best... Ashach tumchya stories warchewar wachayla miltil hi asha krte...
ReplyDeleteRegards,
Madhuri Vetal
Thank you Madhuri
Deleteखुप छान गोष्ट आहे, मनाला भावलेली व मन हेलावून सोडणारी आहे. तुम्ही खूप छान लिहिली आहे असंच छान लिहीत रहा. खुप खुप शुभेच्छा
ReplyDeleteThank you je koni Anamik ahe te...
DeleteThank you Mrunal
ReplyDeleteखुपच छान लिहिलं आहे असंच छान छान गोष्टी तयार करत राहा आणि लिहित राहा
ReplyDeleteThank you...
DeleteMast aahe
ReplyDeleteअतिशय सुंदर वर्णन केले आहे सर .. Heart touching moments ahet ... Sir aasech lhiht raha 🤩 Mala khupch aavdli ahe. Me wait kart ahe sir next story chi 😍🙌
ReplyDeleteThank you Sir... Please write name also...
DeleteVery nice and heart touching story
ReplyDeleteThank you please write name next time...
DeleteRealistic description ! while reading, I felt like that it is actually happening in front of my eyes. Actual pen picture of the unfortunate, innocent, helpless little boy drawn in suitable words. Good attempt. Best wishes for the upcoming writing. Heart touching!
ReplyDeleteThank you sis...
Deleteखूपच छान वर्णन केले आहे
ReplyDeleteThank you.. please write your name too
Deleteआपण फार सुरक्षित वातावरणात आई-वडिलांच्या छत्रछायेखाली वाढलो पण समाजात हे वास्तव आहे. ते तुम्ही अचूक टिपले आणि प्रभावीपणे मांडले.
ReplyDeletevery true
DeleteThis story shows the reality of world. Very nice story.
ReplyDeletePlease send more and more interesting and nice stories.
ReplyDeleteThank you
Deleteखुप छान लिहलेय, पण वाचताना फार वाईट वाटले त्या मुलाबद्दल, असे कुणाबाबतीत हि घडु नये.
ReplyDeleteइतकी आई निष्ठुर असेल?
Kharay
Deleteआपण एखादी स्टोरी मनापासून वाचत असतो तेव्हा त्या स्टोरीमधला एखादा प्रसंग किंवा ती पूर्ण स्टोरी आपल्या डोळ्यासमोर दिसत असते .आणि आपण ते feel करत असतो.हि स्टोरी खूपच भावनिक आणि विचार करायला लावणारी आहे
ReplyDeletekharay Thank you for reading
Delete
ReplyDeleteखरच डोळ्यात आश्रू
आले. अतिशय सुंदर
वर्णन आहे. HEART TOUCHING STORY!
Thank you bala....
Deleteसंपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहीलं.. ह्रदयस्पर्शी..
ReplyDeleteThank you. Please mention name next time..
Deleteअतिशय भावनीक व संवेदनशिल पद्धतीने प्रसंगाचे वर्णन करून समाजाच्या जगण्याची एक काळी बाजू समर्पक रितीने वाचकांसमोर आपण मांडली आहे.
ReplyDeleteगोष्ट एक अर्थ अनेक
Sensitive and Heart touching story
Thank you Sir/Madam...
DeleteThought provoking article , Sir thanks for providing stimulus to the society who has become unsensational being busy in materialistic life and also for making aware people to look into this social issues by pinching through this article
ReplyDeleteLooking forward for such good stimuli for social welfare
Regards
Dr. Vaishali
Thank you so much Madam...
Deleteलालित्यपूर्ण किनार असलेल्या या कथेमध्ये प्रसंग एकच आहे , परंतु पुरुषप्रधान संस्कृतीने जाणीवपूर्वक राबविलेल्या व्यवस्थेविरुद्ध विचार करायला लावणार आहे,
ReplyDeleteThank you so much Sir..
Deleteआह....!
ReplyDeleteसर एक विदारक असा सफर झाला (मराठी आणि इंग्लिश, दोन्ही अर्थांनी).
लिहीत रहा...!
Tumhi tar compliment madhe sudha deviation anta Sir... nice thank you.
DeleteIts really good. Incidence came in front of my eyes.
ReplyDeleteThank you.. write name also
DeleteRight.!!! Kittyek mul ashich jagtayt.. potbhar khanyache pn haal hotat.. je mandly te wachtana bad feel hot.. Ani lihat rha.. Chan mandly.. best wishes.!! From Saif
ReplyDeleteThank you Saif...
Delete