एक काळी संध्याकाळ संध्याकाळचे जेमतेम साडे पाच वाजले असतील, मी आई-बाबांना घेऊन लक्ष्मीपुरी मध्ये पोचलो. त्यांची रेगुलर अपॉइंटमेंट होती जोशी डॉक्टरांकडे. मी गाडी दवाखान्याच्या इमारती समोर उभी केली. सूर्य मावळतीला आला होता, सावल्या लांबणीला लागल्या होत्या आणि उंच इमारती मागून तो दिसेनासा झाला होता. आई-बाबा अपॉइंटमेंट चुकेल म्हणून तडक दवाखान्यात निघून गेले. लक्ष्मीपुरी तशी कोल्हापूरची प्रसिद्ध बाजारपेठ, सदैव गजबजलेली. संध्याकाळची वेळ असल्याने बरेच कामगार, हमाल हे आपलं काम आटोपून आपापल्या घरी जायच्या गडबडीत दिसत होते. काही दुकानांमध्ये गिऱ्हाइकांची गर्दी अजूनही होतीच आणि रस्त्यावर लोकांची येजा सुरूच होती. जोशींच्या दवाखान्यात जायचं म्हटलं की एक दोन तास तरी वाट बघायला लागायचीच. मी मात्र गाडीतच राहण पसंत करायचो. कधी रेडिओ ऐकायचो तर कधी मित्र मैत...